Ad will apear here
Next
‘वोक्हार्ट’ बनले वंचित बालकांसाठी ‘सांताक्लॉज’


मुंबई : ख्रिसमसमध्ये लहान मुलांना सांताक्लॉज आणि त्याचाकडून मिळणाऱ्या भेटवस्तूंचे आकर्षण असते; मात्र आर्थिक परिस्थितीमुळे वंचित कुटुंबातील मुलांना या गोष्टींचा आनंद घेता येत नाही. म्हणूनच अशा वंचितांच्या चेहऱ्यावर आनंद आणण्यासाठी मुंबई सेंट्रल येथील वोक्हार्ट रुग्णालयाने सुमारे २५ विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे आणि नवीन कपड्यांचे वाटप केले. सरत्या वर्षातच नववर्षाची भेट मिळाल्याने ही चिमुरडी आनंदून गेली. या मुलांसाठी रुग्णालयातर्फे मनोरंजनात्मक खेळांचे आयोजनही करण्यात आले होते.



‘वोक्हार्ट’चे प्रमुख डॉ. पराग रिदानी म्हणाले, ‘गेली पाच वर्षे आम्ही अशा प्रकारचे उपक्रम राबवित आहोत. या उपक्रमांमुळे गरजू विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळतो. या उपक्रमात सांताक्लॉजने विद्यार्थ्यांना गोड पदार्थांचे वाटप केले; तसेच खेळ आणि गाण्यांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यामध्ये रुग्णालयातील कर्मचारी देखील सहभागी झाले होते.’

(Please click here to read this news in English.)
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/RZKCBV
Similar Posts
जेट एअरवेजतर्फे प्रवाशांसाठी विशेष मेजवानी मुंबई : यंदाच्या सणासुदीच्या कालावधीत जेट एअरवेजच्या विमानाने लंडनला प्रवास करणाऱ्या प्रवाशांना रोस्ट चिकन व युल लॉग अशी विशेष मेजवानी मिळणार आहे. भारतातील प्रीमिअर, परिपूर्ण सेवा देणाऱ्या या आंतरराष्ट्रीय विमान कंपनीतर्फे मुंबई व दिल्ली ते लंडन हिथ्रो यादरम्यानच्या निवडक विमानांत ख्रिसमस साजरा केला जाणार आहे
‘वोक्हार्ट’तर्फे पाच हजार स्ट्रेस बॉल्सचे वितरण मुंबई : जागतिक हृदय दिनाचे औचित्य साधून ताण आणि उच्च रक्तदाबामुळे वाढलेल्या हृदयविकारांबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी मुंबई सेंट्रल येथील वोक्हार्ट रुग्णालयातर्फे खासगी कंपन्या व पोलीस खात्यातील पाच हजारहून अधिक कर्मचाऱ्यांना स्ट्रेस बॉल वितरीत केले जाणार आहेत. २५ सप्टेंबर रोजी आग्रीपाडा पोलीस ठाण्यात
निकामी होणाऱ्या हाताला वाचविण्यात ‘वोक्हार्ट’च्या डॉक्टरांना यश मुंबई : मुंबई सेंट्रल येथील वोक्हार्ट हॉस्पिटलमधील हृदयविकारतज्ज्ञ डॉ. रवी गुप्ता यांच्या नेतृत्वाखाली टीमला ६५ वर्षीय शांतीलाल जैन यांच्या हातातील रक्तवाहिनीत झालेल्या गुठळीवर यशस्वी उपचार करत निकामी होणाऱ्या हाताला वाचविण्यात यश आले आहे.
कर्करोगाविषयी जनजागृतीसाठी वोक्हार्ट हॉस्पिटलचा पुढाकार मुंबई : कर्करोगाविषयीची अधिक माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी मीरा रोड येथील ‘वोक्हार्ट हॉस्पिटल’तर्फे रविवारी २३ जुलै रोजी विरार येथील मेवाड भवन येथे कर्करोग जागरूकता शिबिर भरवण्यात आले होते. या शिबिराला ३००हून अधिक नागरिक उपस्थित होते. या शिबिराला वोक्हार्ट हॉस्पिटलच्या कर्करोगतज्ज्ञ डॉ. उमा

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language